logo

तेलकामठी येथून वाहणाऱ्या केसरनालेत पटेरा गवताचे माझले थैमान

कळमेश्वर
तालुक्यातील तेलकामठी गावातून वाहणाऱ्या केसरनाल्यात पटेरा गवत अति प्रमाणात वाढल्याने जवळ जवळ नाल्या पूर्णतः बुझला आहे. अशावेळेस वेळेवर पाऊसाला सुरुवात झाली तर नाल्या पूर्णतः बुझला असल्यामुळे गावात पाणी शिरून धोक्या उद्भवनेची शक्यता नाकारता येत नाही.तसेच नाल्यामधून गावाला जोडणाऱ्या वॉर्ड क्र.३ ते वॉर्ड क्र.४ (पहिलेपार) पुलाची आताची स्थिती पाहता पावसाळा येण्यापूर्वी दुरुस्ती करण्याच्या परिस्थितीत पुलाची अवस्था दिसुन येत आहे.
तरी पाऊसाळा येणे पुर्वी पटेरा गवताला गावातून वाहणाऱ्या केसनाल्यातून काढून टाकण्याची व पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी ग्राम पंचायत तेलकामठी कडे गावातील नागरिकांनी केली आहे.

366
10152 views